Tuesday, 27 December 2016

कासव : organic, mystic आणि spiritual कॉफी ! - अभिजीत कदम.

कासव : organic, mystic आणि spiritual कॉफी !
                                                                     - अभिजीत कदम.


      काल पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KIFF) सुमित्रा भावे-सुनिल सुकथनकरांचा " कासव " अनुभवला. अनुभवला यासाठी कारण या जोडीचे सिनेमे पाहण्यापेक्षा अनुभवता येतात असं मला वाटतं.  झोक्यावर नुसतं बसणं आणि झोक्याचा अनुभव घेणं यात जसा फरक आहे तसाच फरक चित्रपट पाहणं आणि अनुभवणं यात आहे.
    "कासव" डोक्यातुन जात नव्हता म्हणुन डोक्यातुन जेवढा काढता येईल तेवढा इथं काढलाय. (याला review म्हणता येणार नाही)

                                 


         १. U. S. मध्ये आरामी आयुष्य जगत असूनही भिन्न स्वभावी/व्यस्त नवरा आणि सोळाव्या वर्षी independant झालेला मुलगा यामुळं जानकी (इरावती हर्षे) खुप एकटी पडलेली असते. ती divorce च्या process मध्ये असते. एकटेपणामुळं आलेलं नैराश्य आणि आत्महत्येचा विचार तिलाही येऊन गेलेला असतो. यातून सुटण्यासाठी तिनं एका psychiatrist चा सल्ला घेतलेला असतो, तिची treatment सकारात्मकरित्या चालू असते.   भारतात आल्यावर तिची ओळख दत्तुभाऊंशी (डॉ. मोहन आगाशे) होते, जे ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजातीच्या (त्यांची अंडी आणि त्यातून बाहेर पडून पुन्हा समुद्रात जाणारी लहान पिल्लं ) संवर्धनासाठी प्रकल्प चालवत असतात. तिलाही तो प्रकल्प आणि एकूणच दत्तुभाऊंची त्या प्रकल्पाकडं पाहण्याची दृष्टी खूप आवडते आणि तीपण या प्रकल्पाचा भाग होते.
         एकदा प्रवासात तिला एक अशक्त तरुण (मानव : आलोक राजवाडे) एका हॉटेलबाहेर पडलेला दिसतो, ती त्याला घरी आणते. पुढं समजतं की तोपण नैराश्यानं ग्रासलेला आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या स्वतःच्या treatment बरोबर ती त्याला त्याची space देऊन, त्यालाही treat करण्याच्या प्रयत्नात असते.

        २. या कथानकाला समांतर आणखी एक प्रक्रिया चालू असते. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी कासवांनी समुद्रातून बाहेर येऊन अंडी घातलेली असतात आणि 55/58 दिवसांनी त्यातून छोटी पिल्लं बाहेर येऊन लगेच ती समुद्रात येऊन मिळणार असतात.
        दत्तुभाऊंच्या सांगण्यानुसार ही प्रजाती डायनोसॉर च्या आधीची असून अजून अस्तित्वात आहे, सगळ्यात पुरातन असणारी प्रजाती आणि म्हणून यांना वाचवणं म्हणजे सजीवसृष्टी वाचवण्यासारखं आहे!
     
       ३. एका छोट्याश्या उपकथानकात कोकणातील दशावतारात अश्वत्थात्म्याची कथा दाखवली जाते / त्याचा उल्लेख केला जातो.
 "अश्वत्थामा अमर होता पण त्याची जखम आणि वेदना मृत्यपेक्षा वाईट होत्या" असा उल्लेख येतो.

        ४. जाणकीकडं बहुधा लोकगीत लिहिलेली ( बहुतेक handmade recycled paper ची ) डायरी असते, त्यातली २ गाणी : लहर समंदर रे आणि अपने ही रंग मे.
          मानव कधीकधी आर्त स्वरात निःशब्द काहीतरी गात असतो / फक्त आलाप. आणि "अपने ही रंग मे" जानकी गात असताना आर्त आलापात तिच्याबर गातो.
          मानवाच्या डायरीत जनकीला त्याच्या कविता दिसतात, absurd कविता, त्या आर्त स्वरातल्या निशब्द गाण्याशी नातं सांगणाऱ्या !

      ५. कोकणातील किनाऱ्यावरील ते गाव, गावाचा arial सुंदर view.      मानवला मासे पकडण्याच्या जुन्या आणि नव्या पद्धतीबद्दल सांगणारा यदु: जनकीचा ड्राइव्हर ( किशोर कदम ),मासे पकडण्याची जुनी पद्धत कशी sustainable, सामूहिक,जिवंत माणसाळलेली तर नवी कशी यांत्रिक, निर्जीव आहे हे त्याच्या शब्दात सांगतो.
         त्या गावातील स्टँडवर चहा विकणारा लहान मुलगा स्टँडवरच राहणाऱ्या म्हाताऱ्याला आजोबा म्हणून त्याला फुकट चहा देतो, मानवला समुद्राच्या तारुण्याबद्दल सांगतो. त्याच्या इवल्याश्या वयात आलेलं शहाणपण मानवाला सांगून त्याला चकित करतो.
       


        दुधात थोडी कॉफी आणि थोडी साखर टाकुन एकत्र मिसळून, गरम करून जशी मस्त कॉफी तयार होते, आणि त्यात दूध, साखर असूनही आपण त्याला कॉफी म्हणतो आणि पितो. तेव्हा दुधाचं, साखरेचं किंवा कॉफीचं स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. आणि तो कॉफी नावाचा नवीन पदार्थ पिऊन झाल्यावरही जिभेवर बराच काळ रेंगाळतो. "कासव"  तसाच आहे.

         वर नमूद केलेल्या ठळक ५ गोष्टी आणि आणखीही लहान तरी महत्वाच्या ( god is in details अशी एक quote आहे movie मध्ये )गोष्टींनी कासवापुरता मर्यादित न राहणारा पण कासवाशिवाय अर्थही नसणारा असा  "कासव" आहे.

       "देवराई", "नितळ", "अस्तू" आणि आता " कासव " पाहताना एक समान अनुभव आला. असाच अनुभव " विहीर " , "ship of theseus" पाहताना आणि " देऊळ " मधील शेवटचा scene पाहतानाही आला होता. हे सगळे सिनेमे पाहून झाल्यावर मन खूप शांत झालं होतं, कुणाशी काही बोलू वाटलं नव्हतं. विशेषण द्यायचं झालं तर "Organic" , "spiritual", "mystic" अशी विशेषणं यांना देता येतील. किंवा माझ्यापुरते हे सिनेमे या विशेषणांच्या  एका वर्गात वर्गीकृत करता येतात. "ऊर्जा अक्षय्यतेचा नियम" शिकल्यानंतर आणि १२वी मध्ये कुठलीतरी science fiction वाचल्यानंतर अशीच मानसिक स्थिती झाली होती.

"कासव" किंवा वर नमूद केलेले सिनेमे हे अनुभवायला खूप चांगले वाटले. त्यांच्यात एकरूप झाल्यासारखं वाटलं. बऱ्याच गोष्टी आकलनाच्या पलीकडं होत्या त्यांचं आकलन झालं असतं तर आणखी चांगल्याप्रकारे "कासव" अनुभवता आला असता / त्याच्याशी एकरूप होता आलं असतं.

"अस्तु" पाहतानाही असंच झालं होतं. संस्कृत मधील श्लोक आणि "सोहम्.." गाण्याचं आकलन आणि त्यांचे सिनेमातील संदर्भ याच आकलन झालं नव्हतं.
"कासव" मध्येही काही गोष्टींचं आकलन नाही झालं. जानकी मानवाला "Niche" नावानं हाक मारत असते. त्या "Niche" चा संदर्भ समजला नाही.


सिनेमातील २ गीतं सुनील सुकथनकरांनी लिहिली आहेत.
"लेहरे समंदर रे..."
संगीत : साकेत कानेटकर.
गायिका : सायली खरे.

आणि "अपने ही रंग मे..."
संगीत : साकेत कानेटकर.
गायिका : सायली खरे ,
गायक : आलोक राजवाडे.

दोन्ही गाणी हरवून टाकणारी आहेत! अगदी विरघळून जातात सिनेमात, आणि आपण या गाण्यात !
मी movie पाहून झाल्यावर साकेत कानेटकरला fb वर शोधलं, त्याने दोन्ही गाणी soundcloud वर ऐकण्यासाठी उपलब्ध केली आहेत. आणि मला त्याच्या profile वर "अस्तू" मधील कन्नड अंगाई सुद्धा मिळाली. ज्यांनी "अस्तू" पहिला असेल त्यांना नक्कीच हे गाणं हवं असेल, त्यांना soundcloud वर साकेत च्या profile वर ती अंगाई मिळेल.

वर लिहिलेले सिनेमे तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला हा सिनेमाही अनुभवायला नक्कीच खूप आवडेल.


     


Thursday, 18 February 2016

निचरा

सनसनाटी बातम्यांनीं भरलेले मथळे,
जोराचे वाद, फिरणारे हात,
आंदोलने, मोर्चे , झेंडे, फलक,
घोषणा, सभा, भाषण, टाळ्या,
चप्पल, शाई, थप्पड़, कॅमेरे,
उपोषण, पाणि, लाठी, गोळी,
अभिव्यक्ति, अधिकार,
अस्मिता, अस्तित्व ,
समानता, सहिष्णुता,
अमुकवापसी, तमुकवापसी,
आतचे बगळे असले आहेत,
तेव्हचेसुद्धा तसले होते,
असले तसले सगळे पांढरे,
रंजन घ्या कांत घ्या,
राज्यशास्त्राची डिक्शनरी घ्या,
सगळे शब्द बदाबदा ओता,
शब्दांचा मस्त चिखल होतो,
चिखलाशेजारी दुपार असते,
दुपारी भूक लागते,
ताटाशेजारी झेंडे असतात,
झेण्डेवाल्यांचे मुखवटे असतात,
गाडीन चिरडणाऱ्याचे पंखे असतात,
भगवा, तांबडा, हिरवा, निळा, काळा, कधी पांढरा रंग असतात,
चिखल आणि झेण्डेवाल्यांवर-
विचार-बिचारसरणींची जाळी असतात,
इजम-बिजम ची नेटं असतात,
जेवण झाल्यावर acid rain असते,
कपाट, फायली, प्रिंटा,
खटखट,क्लिक,क्लोज,
1,2,3,4,
हेवेदावे,आतल्या गाठी,
रंगीत कागद,लाचार डोळे,
त्याच्यानंतर दलदल असते,
वाट्सअप,फेसबुक,चिवचिव,
मेसेज,कॉल,बॅटरी,मेमरी......

दलदली पलिकड़ असीम हिरवळ,
निर्मनुष्य शांतता,
थोड़ मृगजळ - थोड़ पाणि...

बिरबलाची खिचड़ी शिजली नव्हती,
पण आयुष्य स्वादिष्ट होण्यासाठी दुरच्याही शेकोटीची गरज आहे.

Monday, 24 August 2015

तुला पुन्हा भेटल्यानंतर....

ए,
तु अजुन तश्शीच आहेस की....!
धांदरट...धडपडी...बडबडी...
खिदळणारी...मुसमुसणारी...
पहिल्यांदा भेटणाऱ्याचं ragging घेणारी,
आणि त्यालाच जिवलग मित्र करणारी...!

तुझा बहर कधीच न संपणारा,
तुझा रंग कधी न उतरणारा...!

तुझ्यापासून तुटल्यावर तुझ्याकड येऊ वाटत नाही,
आणि आलोच कधी तर परत जाऊ वाटत नाही...!
कारणतु पहिल्यांदा नकार देतेस,
मग हळूच मैत्री करतेस,
नकळत कधीतरी प्रेमात पाडतेस,
मोहाची जाळ्यात गुरफटून टाकतेस...!

कधीच न उतरणारी नशा तु,
एक न उलगडलेलं कोडं तु,
समुद्राला खेचणारा चंद्र तु,
राखेतुन उठणारा फिनिक्स तु,
कोसळणाऱ्या धबधब्यासारखी जिवंत तु,
मुलांच्या हसण्यासारखी उत्स्फूर्त तु,
पगडीपासुन दाढीपर्यंत,
गंधापासून क्रॉसपर्यंत,
सातही रंगांची तु,
सातही सुरांची तु...!

तु म्हणजे,
गर्दीच गर्दी, घामाचा वास, मिसळणारे श्वास,
टाळांचे आवाज, टाळ्यांचे आवाज, टवाळांचे आवाज,
भव्य राजवाडे आणि बकाल झोपड्या...!

तु म्हणजे,
समुद्राच्या बेभानपनाची नशा चढलेले काठावरील बेभान समुद्र,
पायाला भिंगरी बांधलेली काळी पिवळी आणि गडद गुलाबी.,
नवीन नांदायला आलेली एकटी आणि भुयारी...

तु पुरानी जीन्स आहेस,
तु मुरलेली वाईन आहेस,
वय वाढेल तशी तरुण होणारी,
तु timeless queen आहेस...!
कुंकू जाऊन टिकली येतेय,
टिकली जाऊन टिंब येईल...
वयानं अजुन तरुण होतेय,
जादू तुझी अशीच राहील...!


-    तुझाच दोस्त,
  अभिजीत.   
     
 










































Sunday, 16 August 2015

हज़ारों ख्वाहिशें ऐसी...


नुसत्या स्वप्नात मश्गुल राहतो मी... स्वप्नातच मी काय काय होत असतो... स्वप्नातच कुठ कुठ जात असतो...स्वप्नांना बंधनं नसतात..ती मुक्त असतात...स्वप्नांच्या आकाशात मुक्त विहार करत बसतो मी...वेळ जात राहतो...त्यातलं एकही स्वप्न पूर्ण करण्याकड एक पाउलही नाही पडत माझं .. हा पण स्वप्न पाहणं कधी बंद करत नाही मी...
हजारो स्वप्नं, आशा आकांक्षा, इच्छा.... माणसाच्या जगण्याला मर्यादा आहेत...काळाच्या मर्यादेत मिळालेलं मर्यादित आयुष्य आणि इच्छा, स्वप्नं, आकांक्षा मात्र अमर्याद...
economics मध्ये जशी limited resources आणि unlimited wants ची सांगड घालावी लागते तशीच सांगड जगण्यातही घालावी लागते...पण म्हणून इच्छा किंवा स्वप्नं पहायची बंद करत नाही आपण...
economics says wants are unlimited …
हिच गोष्ट गालीबजी त्यांच्या style मध्ये सांगतात...



पण नुसत्या स्वप्नांना काहीच अर्थ रहात नाही..जोपर्यंत त्या स्वप्नांच्या दिशेन एकही पाउल पडत नाही... स्वप्नरंजनात वेळ निघून जातो..आपण मात्र तिथच उभे असतो पुढ जाण्याचं स्वप्न बघत...
पण जर स्वप्न पूर्ण झालं तर त्या स्वप्नाला किंमत राहील का??
म्हणजे माझ्या आळशी आणि निरुत्साही स्वभावाला defend करण्यासाठी कदाचित मला असं वाटू शकत असेल पण मला कधी कधी अस वाटत कि स्वप्न जर पूर्ण झाल तर त्या स्वप्नाला काही किंमत राहील काय??
पण गालीबजींनी या प्रश्नाला उत्तर दिलाय! .......हजारो ख्वाहिशें ऎसी के हर ख्वाहिश पे दम निकले...माझी एवढी स्वप्नं आहेत...कि एकेक स्वप्न पूर्ण करायचं म्हटलं तरी आयुष्य संपून जाईल...
आणि नुसती स्वप्नंच पहात राहिलो तर स्वप्नांची साखळी होते कधी कधी...मग ती स्वप्न कितीतरी प्रकारची असतात...
अनंत असतात... तरीही कमीच असतात...
“बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले”
एकमेकला जोडून येणारी अनंत स्वप्न....कधीही सुरु होते हि स्वप्नांची साखळी अभिक्रिया...
एखादं गाणं ऐकताना...
गुलझारजींच आनेवाला पल ऐकताना specially 
"इक बार वक़्त से लम्हा गिरा कही,
 वहा दास्तां हुई लम्हा कही नही"
या lines ऐकताना,
 “हो सके तो इसमे ज़िन्दगी बिता दो,
  पल जो ये जानेवाला है”
अस म्हणत मी प्रत्येक क्षण भरभरून जगण्याचं स्वप्न पाहू लागतो..उद्याची पर्वा न करता आणि कालचा विचार न करता जगण्याचं स्वप्न... ते गाणं संपेपर्यंत आणि आणि त्या गाण्याच्या sphere of influence मध्ये मी असेपर्यंत तरी मी स्वप्नांमध्ये तसा जगत असतो...

ये जवानी...मधील इलाही ऐकताना specially
कल पे सवाल है,
जीना फिलहाल है,
खानाबदोशियों पे ही जाने क्यु,
इलाही मेरा जी आये आये....”
आणि
“मेरा फ़लसबा कंधे पे मेरा बस्ता
चला में जहा ले चला मुझे रस्ता
बूंदों पे नही बूंदों के समंदर पे....
इलाही मेरा....”
या lines ऐकताना मी माझ्या स्वप्नाच्या जगातला ख़ानाबदोश असतो...एकदम gypsy….
Che Guevara ची biography वाचताना त्याच्या motorcycle diary बद्दल वाचताना तर माझी स्वप्नात तंद्रीच लागली होती...वाचताना मध्येच...मी पण एक बाईक घेऊन “कंधेपे बस्ता लेके” फिरत होतो...माझ आणखी एक स्वप्न...! खूप फिरायचय...नुसत फिरायचय...Without destination…कदाचित मलाही या without destination फिरण्यात कुठतरी माझी destination सापडेल!

स्वप्नांची एक गोष्ट मला खुप आवडते ती म्हणजे स्वप्नांना निर्बंध नाही, काळाची मर्यादा नाही... मनाला कल्पनेचे पंख लाऊन आपण स्वप्नांच्या दुनियेत मनसोक्त भटकू शकतो... Time-space मध्ये कुठेही!!!

एखादं दर्जेदार नाटक किंवा एखादा क्लासिक picture पाहिला कि मला अभिनेता होऊ वाटत... मनात खुप खोलवर पुरून ठेवलेलं स्वप्न उफाळून वर येत... भान्याच भूत काही दिवस त्रास देत मग...!
प्रवासात असताना तर हमखास मानगुटीवर बसतं भान्याच भूत...मग संपूर्ण प्रवासभर त्याच्याशी गप्पा होतात... त्या भुताला घेऊन मी स्वप्नांच्या दुनियेत.. भूतकाळात जाऊन त्या भुताला मुक्ती देण्याचा प्रयत्न करतो...आणि स्वप्नांच्या मदतीन भान्याच्या भुतापासून तात्पुरती का होईना सुटका मिळवतो...!

जेव्हा माझ्या एखाद्या स्केच ची प्रशंसा होते, तेव्हा खुप मोठ्ठा चित्रकार होण्याचं स्वप्न...
जेव्हा मीच काढलेला एखादा फोटो मलाच आवडतो तेव्हा photographer होण्याचं स्वप्न...
जेव्हा स्पर्धा परीक्षांचा result लागतो तेव्हा IIS होण्याचं स्वप्न...
बेभान होऊन लिहिण्याचं स्वप्न..
दिग्दर्शक, शिक्षक, होण्याचं स्वप्न..
हजारो पुस्तकं वाचण्याचं स्वप्न..
हजारो पिक्चर पाहण्याचं स्वप्न..
बाईक घेऊन नुसतं भटकायचं स्वप्न..
आकाशातून विहार करायचं स्वप्नं...
समुद्रातून फिरायचं स्वप्न..
आर्क्टिकपासून अन्टार्क्टिकापर्यंत...
ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत...
Inception सारखं मनाच्या आतपर्यंत...
Interstellar सारखं जगाच्या बाहेरपर्यंत...
काळ-अवकाशाच्या पलीकडं जाण्याचं स्वप्नं...
भूतकाळात जाऊन इतिहास अनुभवायचं स्वप्नं..
भविष्यात जाऊन उद्यात डोकावण्याच स्वप्नं..


  
एवढं सगळं शक्य नसलं तरी यातलं जेवढ जमतंय तेवढं तरी करूया ना... झोकून देऊन...! आणि न जमलेल्या इच्छांना कल्पनेचे पंख लाऊन स्वप्नांच्या जगात तरी पूर्ण करू..!
पिऊन घेऊया हे जगणं जेवढ जमतंय तेवढ...

“अखंड वाळवंटात फिरलेल्या,
मृगजळापाशी येऊन थांबलेल्या,
अतृप्त प्रवाशासारखा,
एखाद्या अधाशासारखा,
घटघट पिऊन घेतोय,
काळाच्या मर्जीन,
आयुष्याच्या पेल्यात मिळालेलं..मर्यादित जगणं...”